Sharad Pawar On Pune Airport Issue | पुणे विमानतळाचा प्रश्न 15 दिवसात मार्गी लावणार – शरद पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Pune Airport Issue | पुणे जिल्ह्यातील (Pune District) नियोजित विमानतळ (Airport) संदर्भात येत्या पंधरा दिवसात संबंधितांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. बारामती तालुक्यातील (Baramati Taluka) सुपे (Supe) येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या (Vidya Pratishthan Educational Complex) इमारतीच्या पाहणीच्या वेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. (Sharad Pawar On Pune Airport Issue)

 

शरद पवार म्हणाले, विमानतळासंदर्भात जागा निश्चित झाल्या, मात्र संरक्षण (Defense) खात्याने यावर हरकत घेतली आहे. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबीत राहिला आहे. पुढील पंधरा दिवसांत मी स्वत: खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि राज्य सरकारचे (State Government) प्रतिनिधी (Representatives) मिळून संरक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहोत. संरक्षण खात्याचे पुण्यात एक विभाग आहे. त्यांची विमाने रोज सकाळी सरावासाठी या भागातून जात असतात. शेवटी त्यांची भूमिका काय आहे हे समजून घ्यावे लागेल. आणि त्यानंतरच विमानतळ संदर्भातील मार्ग काढला जाईल.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळ (Pune International Airport) नेमके कोठे होणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.
विमानतळ चाकणला (Chakan) होणार का पुरंदर तालुक्यात (Purandar Taluka) होणार याबाबत जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा चालू आहे.
याबाबत शरद पवार यांनी येत्या पंधरावड्यात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच केले. यामुळे या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती, दौंड व पुरंदर तालुक्याच्या लगतच्या गावांसाठी सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लक्ष घातले आहे.
गावात विद्या प्रतिष्ठानचे मोठे शैक्षणिक संकुल उभारले जात आहे.
या बरोबरच उपजिल्हा रुग्णालय (Sub-District Hospital), मोठी बाजार पेठ होणार आहे.
या बाबत विचारले असता. ते म्हणाले विमनतळाचा प्रश्न माझ्याशी संबंधित आहे, असे पवार म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar On Pune Airport Issue | pune airport issue resolved within 15 days ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

FMCG Price Increase | 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात रोजच्या वापरातील ‘या’ गोष्टींचे दर, कंपन्यांनी केली तयारी

 

Sharad Pawar | MIM च्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा! ‘कोरोना’च्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी