Sharad Pawar On Raj Thackeray | ‘एखादं लेक्चर देतात अन् 3-4 महिने भूमिगत होतात’, शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Raj Thackeray | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park, Mumbai) केलेल्या भाषणात राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीच्या राजकारणाला (Caste Politics) सुरुवात झाली. शरद पवारांनाच असं राजकारण हवं असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली. या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा गेल्या काही वर्षातील इतिहास तपासून पहावा, असा सल्ला त्यांनी दिला. ते कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, राज यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. आधी त्यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केलं. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) होते. यानंतर त्यांनी मोदींच्या कारभारावर टीका केली. आता ते पुन्हा मोदींचं कौतुक करत आहेत. भाजपच्या (BJP) जवळपास जाणारी भूमिका घेत आहेत. उद्या ते काय करतील काय म्हणतील, ते मला सांगता येणार नाही.
—
लेक्चर देयचं अन् भूमिगत व्हायचं
राज ठाकरे तीन ते चार महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर (Lecture) देतात. मग पुन्हा तीन ते चार महिने भूमिगत (Underground) होतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. त्यांच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट्य आहे, असंही पवार म्हणाले. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी सरकारच्या (Yogi Government) कामाचं कौतुक केलं. त्यांना उत्तर प्रदेशात नेमकं काय दिसलं माहित नाही. योगींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना कार खाली चिरडण्यात आलं. शेतकऱ्यांचे आंदोलन (Agitation) वर्षभर सुरु होतं. परंतु त्याकडे तिथल्या सरकारचे लक्ष गेलं नाही, असे पवार म्हणाले.
Web Title :- Sharad Pawar On Raj Thackeray | ncp chief sharad pawar hits back at mns chief raj thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update