बारामती: Sharad Pawar On Raj Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. माणसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेक मुलाखती व भाषणांमधून वेळोवेळी शरद पवारांना महाराष्ट्रातील जातीयवादासाठी कारणीभूत ठरवलं आहे.
महाराष्ट्रात १९९८ सालापासून जातीयवाद वेगाने फोफावल्याचा दावा राज ठाकरेंनी भाषणातून केला असून त्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कारणीभूत ठरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या याच आरोपांना आता शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. (Baramati Assembly Election 2024)
शरद पवार म्हणाले, ” मला महाराष्ट्रात एक उदाहरण दाखवावं की मी जातीयवादी राजकारण केलं. ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही, फक्त वक्तव्य केली, टीका-टिप्पणी केली त्यांच्या वक्तव्यावर आपण काय भाष्य करायचं? दुर्लक्ष करायचं”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
“महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात एकच जागा दिली”, असे म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.