Sharad Pawar On Raj Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ठाण्यातील उत्तरसभेत बोलताना आणखी एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर प्रखर टीका केली होती. शरद पवार नास्तिक असून ते छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेत नसल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sharad Pawar On Raj Thackeray)

 

मी फक्त शाहू – फुले – आंबेडकरांचं नाव घेतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा आहे. मी बारामतीच्या (Baramati) मंदिरात जातो, राज ठाकरेंनी बारामतीत जाऊन विचारावं. मी कधी मंदिरात गेल्याचा गाजावाजा करत नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंबाबतही (Babasaheb Purandare) वक्तव्य केलं.

 

बाबासाहेब पुरंदरेंच्या मताशी मी असहमत होतो, हो मी पुरंदरेंबाबत बोललो होतो.
पुरंदरेंवर टीका करणाऱ्यांचा मला अभिमान असल्याचं पवार म्हणाले.
त्यासोबतच राज ठाकरे यांचे आरोप पोरकट असून जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. मतदारांनीच मनसेला संपवलं आहे,
असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

दरम्यान, आयएनएस विक्रांतवरून (INS Vikrant Fund Scam) अडचणीत आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांबाबतही (Kirit Somaiya) पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. विक्रांतसाठी जमा केलेला निधी पक्षाकडे का दिला,
सोमय्यांनी गोळा केलेले पैसे गेले याचा तपास झाला पाहिजे, असं पवार म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar On Raj Thackeray | Sharad Pawars reply to Raj Thackeray for not mentioning Chhatrapati Shivaji Maharajs name Said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा