पुणे : Sharad Pawar On Raj Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) मोर्चेबांधणी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. दरम्यान लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर असणार आहे. आज (दि.१२) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील पलटवार केला. शरद पवार आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddha Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात दंगा भडकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षण आंदोलनाचा (Maratha Reservation Andolan) वापर करत आहेत. तसेच ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आरक्षण आंदोलनाला जातीय राजकारणासाठी ढाल म्हणून वापरत असल्याचे त्यांनी म्हंटले होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत असलेले आपले चांगले संबंध वापरले नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा ते बीड (Beed) दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी अडवला. यानंतर हे पवार आणि ठाकरे गटाचे लोक असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.
या आरोपांवर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन तीन वेळा माझं नाव का घेतलं, कळत नाही. महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो? महाराष्ट्र थोडा फार मलाही कळतो.
मणिपूरचा प्रश्न वेगळा होता. हातभार लावायचा प्रश्न कुठे येतो,
मी बोलतो त्यातून हातभार कसा लागतो? राज ठाकरेंनी माझं नाव विनाकारण घेतलं.
मराठवाड्यात त्यांच्या गाडीवर हल्ला झाला, मीही मराठवाड्यात फिरलो,
तिथे मलाही लोकांनी अडवलं, मला निवेदन दिलं, असं शरद पवार म्हणाले.
पुढे पवार म्हणाले, “राज ठाकरे यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
मी महाराष्ट्रात नेहमीच सकारात्मक बदलांसाठी प्रयत्नशील असतो आणि महाराष्ट्रातील जनतेला माझी भूमिका चांगलीच कळते.”
असे म्हणत त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करण्यास सुरुवात केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा