Sharad Pawar On UPA President | UPA अध्यक्षपद घेणार का ? शरद पवाराचं मोठं विधान; म्हणाले…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On UPA President | भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. या आघाडीचे अर्थात युपीएचे अध्यक्ष पद (UPA President) शरद पवारांनी (Sharad Pawar) स्वीकारावे, असा आग्रह होत आहे. दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (Nationalist Youth Congress) राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक (National Executive Meeting) पार पडली. या बैठकीत शरद पवार हे देखील उपस्थित होते. याच बैठकीत यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि सहमत करण्यात आला. त्यामुळे शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता शरद पवार यांनीच यावर भाष्य केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी बोलत होते. (Sharad Pawar On UPA President)

 

मी नेतृत्व करण्याची जबाबदारी…
शरद पवार म्हणाले, मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्यात पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येवून काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटले. (Sharad Pawar On UPA President)

 

काँग्रेस पक्षाचा वेस व्यापक
विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टी दुर्लक्ष करुन चालणार नाहीत. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पक्ष अत्यंत शक्तिशाली आहे. सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे. इतर सर्व पक्षांचीही राज्या राज्यांमध्ये शक्ती केंद्र आहेत. परंतु काँग्रेस (Congress) असा एक पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आहे. आज त्यांची सत्ता नाही पण कर्यकर्ता देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात, गावात पाहायला मिळतो. त्यामुळे पर्यायी काही करायचे असेल तर ज्या पक्षाचा वेस व्यापक आहे त्याला घेऊन करणं वास्तव्याला धरुन होईल, असेही शरद पवार म्हणाले.

ते त्यांचं मत माझं नाही
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी म्हटले होते की, यूपीएचा सातबारा काँग्रेस आणि गांधी घराण्याकडे (Gandhi Family) आहे. तो बदलण्याची गरज आहे. याबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, त्यांचं मत हे माझं मत असं नाही.

 

प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरायचं नसतं
वाढत्या इंधन दरवाढीबाबत (Fuel Price Hike) बोलताना शरद पवार म्हणाले, सध्या अधिवेशन सुरु आहे. लोकसभा, राज्यसभेत यावरुन विरोधक आक्रमक भूमिका मांडत आहेत. ती मांडली जाईल. प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरायचं नसतं. लोकसभा, राज्यसभा सुरु असताना त्या व्यासपीठाचा उपयोग केला पाहिजे. तिथे काही झाले नाही तर रस्त्यावर उतरुया.

 

मग ते पुतीनसारखे होईल
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (BJP Leader Nitin Gadkari) यांनी काँग्रेस मजबूत झाली पाहिजे असे विधान केले होते.
यावर बोलताना पवार म्हणाले, देशात शक्तीशाली विरोधी पक्ष असण्याची गरज आहे.
संसदीय लोकशाही मजबूत करायची असते. एकच पक्ष असला की मग ते पुतीनसारखं (Putin) होईल.
रशियाने (Russia) ठराव केला, चीनने (China) केला. असे पुतीन होऊ नये ही अपेक्षा आहे.

 

Web Title :- Sharad Pawar On UPA President | ncp chief sharad pawar on upa president congress party

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा