‘कोरोना’विरूध्द लस बनवणार्‍या सिरम संस्थेला शरद पवारांनी दिली अचानकपणे भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक सिरम संस्थेला दिली. त्यांच्या भेटीचे मुख्य कारण काय? हे अद्याप समजलेले नाही. त्यामुळे त्यांच्या भेटीबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.

कोरोना विषाणूचा वाढते संक्रमण लक्षात घेता जगाचे लक्ष सध्या कोरोना लस कधी येणार याकडे लागले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचा इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत लस विकसित करण्याबाबत करार झालाय. त्यामुळे याच विषयाबाबत भेट घेतली आहे का? सध्या कोरोनाचा विषय अधिक चर्चीला जात आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार सुमारे तासभर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होते. त्यांनी हडपसर, मांजरी इथल्या प्लॅन्ट आणि कार्यालय या दोन्ही ठिकाणी भेट घेतली. सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूट व इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये कोरोना लसबाबत झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या भेटीला अधिक महत्व आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांनी भेटीत नेमकी काय चर्चा केली आहे?. याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या भेटीवेळी पवार यांच्यासह बदामराव पंडित व सतीश चव्हाण हे दोघे उपस्थित होते.

कोरोना लस कधी येणार?
ऑक्सफर्डच्या कोरोना लसचं पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी झाली आहे, त्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. ही लस लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युची देखील या लसच्या निर्मितीत भागीदारी आहे. त्यामुळे भारतात देखील ही लस उपलब्ध होणार असून या लसची किंमत किती असेल?, ही लस सर्वसामान्यांना परवडणारी असणार आहे का? असे अनेक प्रश्न पडत आहे. भारतात उपलब्ध होणार्‍या ऑक्सफर्डच्या कोरोना लसची किंमत एक हजारपेक्षाही कमी असणार आहे. तसेच ही लस सर्वसामान्यांनाही परवडण्यासारखी असेल, असे म्हटलं जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like