Sharad Pawar | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘आणखी दरवाढीची शक्यता’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूका (Assembly Elections) पार पडल्यानंतर इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच शरद पवारांनी (Sharad Pawar) इंधनासाठी पर्याय सांगितला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (PM Narendra Modi) आवाहन केलं आहे.

 

पेट्रोल-डिझेलचे (Fuel) दर वाढले आहेत ही खरी गोष्ट आहे मात्र ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशाने जेव्हा याबाबत काही पावलं उचलणं गरजेचं होतं त्यावेळी त्यांनी काही केलं नाही. इंधन दरवाढीला सरकारचं चुकीचं धोरण कारणीभूत असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.

 

इंधनासाठी इथेनॉल (Ethanol) हा पर्याय आहे. ज्या राज्यांमध्ये ऊसाचे (Sugar Cane) पिक मोठ्या प्रमाणात आहे.
तिथे इथेनॉलची निर्मिती करणारे कारखाने यायला लागले आहेत.
मात्र साखर उद्योगामध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे
त्यासाठी एक राष्ट्रीय धोरण (National Policy) ठरवलं पाहिजे, असं शरद पवारांनी सांगितलं. बारामतीमध्ये (Baramati) ते बोलत होते.

 

दरम्यान, धान्यापासून आणि ऊसापासून इथेनॉल निर्मिती होताना साखर उद्योग (Sugar Industry) टिकेल याची काळजी घेतली पाहिजे.
कारण एकेकाळी कापड उद्योगावर (Textile Industry) देशातील रोजगार (Employment) अवलंबून होता मात्र कापड उद्योग आता बंद झाला.
आता जास्तीत जास्त रोजगार उपलब्धी ही सहकारी साखर कारखानदारी (Cooperative Sugar Industry) आहे.
पंतप्रधान इथेनॉलवर बोलत असतात मात्र जे ते बोलतात त्याला पोषक धोरण अवलंबलं तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असं शरद पवार म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar | petrol diesel price hike sharad pawar slams central government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात प्रेमसंबंधातून झालेल्या ‘त्या’ खून प्रकरणात प्रेयसीला अटक, मुलीनेच कट रचल्याचे तपासात आले समोर

 

Urfi Javed Bold Photo | उर्फी जावेदनं कॅमेरासमोर फ्रंन्ट ओपन ड्रेस घालून दिला सेक्सी लूक, लाल रंगाच्या हॉट ड्रेसनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

 

Goa Mumbai Highway | खारेपाटणमध्ये भीषण अपघात ! पुलावरुन कंटेनर थेट नदीत कोसळला, दोघांचा जागीच मृत्यु