Maharashtra : राष्ट्रपती राजवट लावण्याची शरद पवारांचीच होती योजना, भाजपासोबत सत्तेवर येण्यासाठी होता प्लॅन ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणात बुद्धिबळाचा डाव खेळायला सगळेच तयार असतात. राज्यातील सत्तासंघर्षला एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात नेमकं काय घडलं यावर लेखिका प्रियम गांधी पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळूनही तो विरोधी पक्षाचं काम करत आहे. तर तीन पक्षांनी एकत्र येत महाआघाडीचा सरकार बनवलं.

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना साथ देत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. मात्र या घटनेमागील अनेक पैलू पुस्तकातून उघडण्यात आले आहेत. मात्र, या घटनेमागील अनेक पैलू पुस्तकातून उघडण्यात आले आहेत. शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरून झालेल्या नाराजीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा डाव खेळला. पवारांनी त्यांच्या दोन खास विश्वासू शिलेदारांना भाजपाला पाठिंबा देण्यासाठीवर्षावर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पाठवले. राष्ट्रवादी भाजपासोबत येत सरकार बनण्यासाठी तयार आहे अशी इच्छा सांगितली.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. कोणाला कोणतं मंत्रालय मिळणार? मंत्रिमंडळात किती जागा वाटेला येणार? या बैठकीत निश्चित करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार आणि प्रफुल पटेल या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रवादी आणि भाजपा त्यांच्या सत्तेची निश्चित झाली. मात्र, आता जनतेला काय सांगायचं हा प्रश्न आहे. आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मदत करू त्यानंतर पुढील दहा दिवस मी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जातो त्यानंतर माध्यमांशी बोलेल असं शरद पवारांनी सांगितलं.

सध्या महाराष्ट्रात स्थिर सरकारची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करणार होतं. मात्र, काही दिवसांनी शरद पवारांचं मत परिवर्तन झालं. त्यांनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. पक्षातील अनेक नेते भाजपसोबत सरकार बनविण्यासाठी उत्सुक होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र फडणीस यांच्या घरी गेले. त्यांना शरद पवार आता भाजपासोबत येण्यास तयार नाहीत असं सांगितलं. पण पक्षातील अनेक नेते भाजपासोबत येण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासोबत अजित पवार भाजपसोबत येण्यास तयार आहे त्यासाठी तुम्ही अजित पवार यांच्याशी संपर्क ठेवा आणि आपला जो मूळ हेतू काय आहे त्याच्यावर अंमलबजावणी करा असं त्याने देवेंद्र फडवणीस यांना सांगितलं.

एकाच वेळी दोन दगडांवर पाय शरद पवार यांची राजकीय खेळी
शरद पवार एकीकडे भाजपसोबत सरकार बनवण्यासाठी चर्चा करत ते काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत देखील चर्चा करत होते. शरद पवार यांना काँग्रेस आणि शिवसेना जास्त अधिकार देण्यास तयार होते. तर भाजपसोबत गेल्यास राज्यात देवेंद्र फडणवीस केंद्रात अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या सोबत जुळवून घ्यावं लागणार होतं. अशातच शरद पवार यांना काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यास जास्त फायदा होईल असं वाटलं.

राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांचा फडणवीसांवर आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी लेखिकेला पुढे करत हे पुस्तक लिहल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. हे पुस्तक फडणवीस यांचं आहे. ज्यांनी बेईमानीने सरकार बनवलं त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं काम केलं आहे. ज्या पद्धतीने भाजपनं ८० तासाचं सरकार बनवलं. त्यावरून भाजपची प्रतिमा मलिन झाली. यावर पडदा टाकण्यासाठी असं पुस्तक समोर आणण्यात देवेंद्र फडणीस यांनी हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आलं.

You might also like