‘पॉवरफुल’ शरद पवारांचा अफलातून ‘स्ट्रोक’, भाजपचं ऑपरेशन ‘लोटस’ कोमेजलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांनी राजीनामा दिला. 80 तास चाललेले सरकार धडकन कोसळले. अजित पवार राष्ट्रवादी आमदार फोडून भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणार असे वाटत होते. परंतू घाई घाईत शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना घाई घाईतच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आणि कुटूंबाकडून परत येण्याचे आवाहन केले होते. कुटूंबाकडून भावनिक साद घालण्यात आली.

राज्याचा राजकारणात अनेक कुटूंबात फुट पडली परंतू पवारांच्या कुटूंबात फुट पडली नाही. परंतू काही दिवसांपूर्वी असे काही घडले की पवार कुटूंबात फुट पडली अशी परिस्थिती निर्माण झाली. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे पवार कुटूंबीय.

एवढेच काय तर सुप्रिया सुळे यांनी स्वत: आपल्या भावाला परत ये असे आवाहन केले. अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी स्टेट्स ठेवून पक्षात आणि कुटूंबात फुट पडल्याची भावना व्यक्त केली होती.

अजित पवार भावनिक व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, यावर पवार कुटूंबात निकटवर्तींयाचे एकमत होते. अनेक हितचिंतकांनी, नातेवाईकांनी अजित पवारांना भावनिक साद घातली.

त्यानंतर सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी आज अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील अजित पवारांना परतीचे आवाहन केले. यामुळे यांच्यात शब्दाला मन देऊन अजित पवारांनी राजीनामा दिला असे सांगण्यात येऊ लागला.

Visit : Policenama.com