‘पोलिस आणि तत्कालिन सरकारकडून सत्तेचा गैरवापर’, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 22 मुद्दे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर भाष्य केले. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम आहेत. यामध्ये उलटसुटल चर्चा होत असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
सध्या भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध जोडला जात आहे. पण एल्गार परिषद ही वेगळी आहे. एल्गार परिषद ही भीमा कोरेगावच्या काही दिवस अधी झाली होती. यामध्ये शंभर पेक्षा जास्त संघटना सहभागी झाल्या होत्या. निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी अध्यक्षपद भूषवणार होते, मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने ते येऊ शकले नाहीत. असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले, भीमा कोरेगाव हा एक वेगळा कार्यक्रम आहे. मागील अनेक वर्षापासून या कार्यक्रमासाठी लोक येत असतात. विजय स्तंभाला अभिवादन करतात. या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. पण यामध्ये संभाजी भिडे आणि एकबोटेंकडून वेगळं वातावरण तयार करण्यात आले. त्यावेळी नक्की काय झालं हे बाहेर येईन, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे

1. ब्रिटीशांच्या बाजूने काही भारतीयही लढले
2. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये काहीही कटुता नव्हती
3. कोरेगाव भीमा वेगळा कार्य़क्रम आहे
4. अनेक वर्षापासून लोक कार्यक्रमासाठी जमतात विजय स्तंभाला अभिवादन करतात
5. संभाजी भिडे आणि एकबोटेंकडून वादाला वेगळं वातावरण तयार केलं
6. निवृत्त न्यायमूर्ती यांची प्रकृती बिघडल्याने ते आले नाहीत
7. कोरेगाव आणि एनआरसी वेगळे विषय आहेत
8. एल्गार परिषदेत शंभर पेक्षा अधिक संघटना
9. दंगलीपूर्वी वातावरण निर्मिती
10. हजर नसलेल्यांवर खटले दाखल केले
11. कविता वाचली म्हणून सुजित ढवळेंना अटक, ही कविता नामदेव ढसाळांची होती
12. कुसुमाग्रजांच्याही कविता आक्रमक आहेत
13. पोलिसांच्या मागे सरकारमधील लोक
14. आमची तक्रार पोलिसांच्या विरोधात
15. केंद्राने एवढी तत्परता का दाखली
16. पोलीस आणि सरकारमधील लोकांची चौकशी व्हायला हवी
17. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहताच केंद्राने तपास घेतला
18. तत्कालीन सरकारकडून पोलिसांचा गैरवापर
19. राज्य सरकारने जे करायचे ते करावं, आक्रमक असणे देशविरोधी नाही
20. मला फक्त सगळ्यांची चौकशी करुन ते लोकांसोमोर आणायचे आहे.
21. एल्गार परिषदेत शपथ घेण्याला माझा आक्षेप
22. एल्गार परिषदेची चौकशी व्हावी