अखेर फायनल ! उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वावर ‘सर्वसमंती’, बैठकीनंतर शरद पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व सहमती झाल्याचे सांगितले. बैठकीतून बाहेर आल्यावर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार याचा खुलासा केला आहे. मात्र इतर मुद्यावर अद्यापही चर्चा सुरु असल्याचे पवारांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की नेतृत्वाबाबत आमच्यात समस्या नाही, उद्धव ठाकरेंच्या नावाला आमच्यामध्ये सर्व सहमती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. चर्चा सुरु आहे ती मुख्यमंत्रिपदी कोणाला बसवणार. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांची आज मुंबईत संयुक्त बैठक सुरु होती. या दरम्यान शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवल्याचे वृत्त होते. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हणत पवारांनी उद्धव ठाकरेंना प्राधान्य दिसल्याचे कळत होते.

एकीकडे मुंबईत राजभवनावर सत्तास्थापनेची लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाविकासआघडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक सुरु होती. आजची ही संयुक्त बैठक अत्यंत महत्वाची मानली जात होती. या बैठकीत सत्तावाटपाचा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्रिपदवर चर्चा होणार होती.

या दरम्यान मुख्यमंत्री गटनेत्यांचे नेतृत्व करत असतो त्यामुळे मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावा अशी चर्चा आहे. आता शरद पवार देखील मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर आग्रही आहेत.

परंतू शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद स्विकारण्यास तयार नाही अशी चर्चा होती. परंतू आता जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला तर पवारांची संजय राऊतांना पसंती मिळू शकते असे सांगण्यात येत होते. परंतू आता खुद्द शरद पवारांनीच यावर स्पष्टीकरण दिले.

बैठकीतून बाहेर आल्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही मुद्यावर बोलण्यास नकार दिला. उद्या चर्चा होईल, त्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात येईल असे सांगत त्यांनी प्रश्नांना बगल दिली.

Visit : Policenama.com