Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यामुळे पक्षात फूट पडली आहे (Ajit Pawar Group). पक्षात दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात रोड शो (Ajit Pawar Road Show In Pune) करुन शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुणे दौऱ्यावर येणार असुन त्यांची जाहीर सभा होणार आहे. येत्या 27 ऑक्टोबरला शरद पवारांची पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ही सभा होणार आहे. (Sharad Pawar Public Meeting In Pune)

अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला. त्यातच अजित पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात अजित पवारांनी रोड शो केला. या रोड शो च्या माध्यमातून ताकदीचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर आता गणेश कला क्रिडा रंगमंच येथे येत्या 27 ऑक्टोबरला शरद पवार यांची सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

Advt.

पुढील काही दिवसांमध्ये पुण्यातील शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
या बैठकीमध्ये जहीर सभेचं नियोजन केले जाणार आहे. पुण्यात शरद पवारांचा गट आत
अजित पवारांच्या गटासोबत दोन हात करण्याच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
या जाहीर सभेत शरद पवार हे अजित पवारांवर निशाणा साधणार कि पक्षबांधणीचा प्रयत्न करणार, हे पहावं लागले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Lok Sabha Elections 2024 | अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीची तयारी करण्याची सूचना