‘अजितदादा ‘अर्थमंत्री’ होता म्हणून…’, आता ‘ती’ सवय सोडा ; शरद पवारांच्या शेतकऱ्यांना ‘कानपिचक्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या बारामती तालुक्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक चारा छावण्यांना भेट देत शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या देखील दिल्या. अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून तुम्हाला वीजेचं बील न भरण्याची सवय लागली आहे. ती सवय आता सोडा, असे विधान करून त्यांनी शेतकऱ्यांना समज दिली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील होते.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे देखील काम केले. त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीची दाहकता पाहता चारा छावण्या आणि अनुदान पाऊस सुरु होऊन नवीन चारा तयार होईपर्यंत सुरु ठेवण्याविषयी सरकारला विनंती करण्याचे देखील आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

दरम्यान, या सगळ्यात राज्यात भीषण दुष्काळ पडलेल्या अनेक जिल्ह्यात शासनाने आता पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी पाण्याचा उपसा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कुणी याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.