राफेलच्या नारळ, हार आणि लिंबू पूजेबाबत शरद पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राफेलच्या चाकाखाली ठेवलेल्या लिंबांमुळे राजनाथ सोशल मीडियावर ट्रोल झाले. परदेशात जाऊन राजनाथ यांनी केलेल्या कृतीमुळे भारताबद्दल नेमका काय संदेश जगभरात गेला, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. या घटनेवरून आपल्याकडे बोलायला शब्दचं नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिली आहे.

राजनाथ सिंह यांच्या कृतीवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, ‘सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी राफेल विकत घेण्याच्या निर्णयाबद्दल मला कोणतीही शंका नाही. पण मी वाचलं आहे, ते खरं आहे की नाही मला माहिती नाही परंतू, नव्याने खरेदी केलेल्या ट्रकवर नजर लागू नये म्हणून लिंबू-मिरची लटकवल्याप्रमाणे राफेल लढाऊ विमानाबाबतही असे केले जात असेल तर आपण काय बोलणार ? ‘

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या राफेल विमानाची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये पूजा केली. राजनाथ यांनी विमानावर ओम काढला आणि त्याच्या चाकाखाली लिंबूदेखील ठेवला. राफेलला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवणे हे जरा अतीच असून हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्राची पूजा करण्याची आपली संस्कृती आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like