‘शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –    शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा असे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण 30 वर्षांपासून ऐकत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्यांच स्वातंत्र्य आहे. गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

शरद पवारांनी पुढं म्हणाले, स्थानिक स्वराज् संस्था एकत्र लढवायच्या की, स्वतंत्र हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) घेतील. भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलात तर लोकांना चांगली फळं मिळताना दिसत आहेत त्यामुळं त्याच दिशेनं काम करा असा सल्लाही यावेळी पवारांनी दिला.

सध्या शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कांदा प्रश्नावरही भाष्य केलं. ते म्हणाले, कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नयेत. कांद्याबाबतचे बहुतेक निर्णय हे केंद्र सरकारच्या हातात असतात असंही त्यांनी स्पष्ट केलं.