Sharad Pawar Receives Death Threat Via Twitter | ‘धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड कोण? त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar Receives Death Threat Via Twitter | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai CP) भेट घेऊन रितसर तक्रार दिली. तर धमकीच्या प्रकरणानंतर (Sharad Pawar Receives Death Threat Via Twitter) काही घडले तर त्याला राज्याचे आणि देशाचे गृह मंत्रालय असेल, असा इशारा सुळे यांनी दिला. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरचा (Saurabh Pimpalkar) मास्टरमाईंड कोण? याचा तपास करावा अशी मागणी केली.

 

शरद पवार यांना सौरभ पिंपळकर नावाच्या अकाउंटवरुन धमक्या देण्यात (Sharad Pawar Threat Case) आल्या. तुमचा दाभोळकर करू असं म्हटलं. त्याच्या अकाउंटवर भाजपचा (BJP)कार्यकर्ता असल्याचे लिहिले आहे. आतो तो खरोखर भाजपचा कार्यकर्ता आहे की नाही याची माहिती नाही, पण तसा उल्लेख आहे. त्यांच्या पक्षाने तसं बोलायला सांगितलंय का? संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला आहे.

 

धमकी देणाऱ्याला अटक करा

धमकी देणाऱ्यांना अटक व्हायला हवी. कोण मास्टरमाइंड, कुणी हे करायला भाग पाडलं, त्याच्या मोबाईलची तपासणी करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. पवार पुढे म्हणाले, पक्ष जरुर वाढवा पण तो वाढवताना कारण नसताना इतर राजकीय नेत्यांची बदनामी करायची. त्यांची जनमाणसातली प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वाढले आहे त्याचा धिक्कार करतो. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की इतरांनी चुका केल्या म्हणून आपण करायच्या नाहीत. पोलिसांनी संबंधितांना अटक करावी. नियमानुसार कारवाई करावी. त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे.

 

Web Title :  Sharad Pawar Receives Death Threat Via Twitter | ncp leader ajit pawar reaction on
threatening to sharad pawar on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा