PM नरेंद्र मोदींना माझ्या वडिलांनी विनम्रपणे ‘नकार’ दिला, खा. सुप्रिया सुळेंनी सांगितलं जे ‘घडलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. त्याचे सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.

या बैठकीविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मी बैठकीला नव्हते म्हणून यावर मी बोलणं उचित नाही. पण, मोदींनी ऑफर दिली असेल तर तो मोदींचा मोठेपणाच होता. मात्र, तरीही शरद पवारांनी विनम्रतेनं ती ऑफर नाकारली, हा त्यांचा आदरभाव होता. आमची सर्वात मोठी लढाई भाजपाविरुद्धच होती. निवडणूक काळातही दोन्ही पक्षांनी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपासोबत जाण्याचा प्रश्न नव्हता. मुळात महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे. महाराष्ट्रात व्यक्तिगत संबंधांना खूप महत्त्व आहे.’

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीविषयी सर्वानाच उत्सुकता होती. त्याविषयी शरद पवार यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. पंतप्रधान मोदींनी मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, तसेच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्या केंद्रात चांगली जबादारी घेऊ शकतात.’ अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिल्याचं शरद पवार यांनी काल मुलाखतीत सांगितलं होतं.

Visit : policenama.com