भाजपने स्वार्थासाठी सैन्याचा वापर केला : शरद पवार

उरुळी कांचन : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैन्याचा कधीही वापर केला नाही, पुलवामा व उरी या ठिकाणी सैन्यांनी हल्ला केला, मात्र भाजपच्या सरकारने राजकीय स्वार्थासाठी सैन्याचा वापर करून घेतला. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उरुळी कांचन येथे मांडले.

शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अँड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजार मैदान परिसरात सभेचे आयोजन शुक्रवारी (ता. ११ ) करण्यात आले होते यावेळी शरद पवार बोलत होते.

यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा परिषद कृषि व पशू संवर्धन सभापती सुजाता पवार, शिरूर तालुकाध्यक्ष रवी काळे, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, प्रा. के. डि. कांचन, प्रताप गायकवाड, नंदू काळभोर, माधव काळभोर, प्रकाश म्हस्के, माणिकराव गोते, देविदास भन्साळी, सोपान कांचन, राजाराम कांचन, विकास लवांडे, राजेंद्र कांचन, तात्यासाहेब काळे, देविदास कांचन, जितेंद्र बडेकर, सागर कांचन, संतोष कांचन, हिरामण काकडे, लोचन शिवले, राजेंद्र चौधरी, आण्णा महाडिक, कांतीलाल काळे, योगिनी कांचन, सुभाष टिळेकर, अर्जुन कांचन, अमित कांचन, योगेश शितोळे, प्रदीप वसंत कंद, शंकर भूमकर, चंद्रकांत कोलते, सुभाष बगाडे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, रामदास चौधरी,राजेंद्र टिळेकर, प्रकाश म्हस्के आदि उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अनेक कारखाने आले, एमआयडीसी आल्या. अनेक युवकांना नोकर्‍या मिळाल्या परंतु आता काय?, शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाने काहीतरी दुसरा व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून कुटुंब नीट चालेल, असा सल्लाही त्यांनी दिला. कुणी मुद्याचे बोलतच नाही. महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला, मात्र या विषयांवर बोललं जात नाही. भाजप सरकारने कश्मीर येथील ३७० कलम हटवले त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र त्यांनी ते कलम तेथे राहणार्‍या जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतला नाही त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. त्यामुळे अशा सरकारला घरी बसवले पाहिजे असे आव्हान शरद पवार यांनी केले.

Visit : Policenama.com