स्वतः शरद पवारांनी केला एकनाथ खडसेंबाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ ! जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तीन महिन्यांपासून संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवारांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचा दौरा अर्धवट सोडून आज खडसेंच्या भेटीसाठी गेले अशीही चर्चा सुरु आहे. भाजपच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये स्थान न मिळाल्याने खडसे नाराज आहेत.

अपक्ष निवडणूक लढवाण्याची कार्यकर्त्यांची मागणी-

भाजपने जाहीर केलेल्या विधानसभा मतदासंघातील उमेदवारांच्या दोन्ही याद्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव नसल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. तिकीट न मिळाल्याने खडसे यांनी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. दरम्यान खडसे यांनी आपण सगळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून पक्ष योग्य निर्णय घेईल असे म्हणाले आहेत.

खडसेंनी वृत्त फेटाळले-

एकनाथ खडसे तीन महिन्यांपासून संपर्कात असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली असली तरी खडसे यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. तीन महिनेच काय पण आपण तीन वर्षांपासून शरद पवारांच्या संपर्कात नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Visit : Policenama.com