जलसंपदा मंत्र्यांच्या ‘त्या’ आदेशावर शरद पवार भडकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बारामतीला जाणारे नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी रोखण्याच्या जलंसपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकारणात कुठे काय करावे याचं तारतम्य जपलं पाहिजे अशा शब्दात पवारांनी गिरीश महाजन यांचे कान टोचले आहेत.

नीरा- देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. त्याबाबतचा शासकिय अध्यादेश दोन दिवसांत काढला जाईल असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर अशा बातम्या झळकल्या तेव्हा शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी महाजन यांचे नाव घेता त्यांच्यावर संताप व्यक्त केला.

काय म्हणाले शरद पवार ?
राजकारणात कुठे काय करावे याचे तारतंम्य जपले पाहिजे. जिल्ह्या-जिल्ह्यात दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. अशी संतप्त प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावर दिली.

काय आहे पाण्याचा वाद
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यात नीरा देवधर धरणातून ६० टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला तर ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, तालुक्याला देण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. याचा करार २०१७ पर्यंतचा करण्यात आला होता. रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे सभापतीपद मिळाल्याने या कराराला विरोध न करता संमती दिली होती. ३ एप्रिल २०१७ रोजी हा करार संपला मात्र तरीही बेकायदेशीररित्या बारामती तालुक्याला पाणी दिले जात होते. आता हे बेकायदा पाणी बंद करून पुन्हा फलटण, माळशिर, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळावे अशी मागणी खासदार नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली होती.