Sharad Pawar | शरद पवारांनी केला ‘हा’ गंभीर आरोप; म्हणाले – ‘ईडीचा असा गैरवापर कधीच झाला नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अनेक नेते सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात (Pune) माध्यमांशी बोलताना यावर थेट टीका केली आहे. हा गैरप्रकार महाराष्ट्रापुरताच (Maharashtra) मर्यादित नाही तर अन्य राज्यांत देखील हे चालेले आहे, असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकारला (Modi government) लक्ष्य केले.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांची मागील काही काळापासून ईडी चौकशी (ED Inquiry) सुरु आहे. देशमुख प्रकरणात आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना देखील चौकशीसाठी बोलावले आहे. या सर्व प्रकाराबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी ईडी या तपास यंत्रणेचा वापर होत असल्याचा थेट आरोप केला आहे.

शरद पवार म्हणाले, देशामध्ये ईडीचा अशा प्रकारे कधीच वापर करण्यात आलेला नाही. हल्लीचं सरकार विरोधकांना नमवण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्याची भूमिका घेताना दिसत आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यातही चाललं असल्याचे त्यांनी सांगितले. आपण फक्त महाराष्ट्रातील आपल्याला माहित असलेल्या लोकांची चर्चा करत आहोत. परंतु हा गैरप्रकार महारष्ट्रापुरता मर्यादित नाही तर पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश यासह दक्षिणेतील काही राज्यांमध्येही सुरु असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

 

Web Title : Sharad Pawar | sharad pawar accuses modi govt of using ed to pressurise opposition leaders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | दि पूना गुजराती केळवाणी मंडळाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मान

WhatsApp युजर्सला मोठा झटका ! लवकरच ‘या’ 43 स्मार्टफोनवर नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, तुमचा फोन तर यादीत समाविष्ट नाही ना?, जाणून घ्या

Cryptocurrency गुंतवणुकदारांसाठी मोठी बातमी ! कमोडिटीप्रमाणे असेल ‘ही’ करन्सी, कमाईवर लागणार Tax, लागू होतील नियम; जाणून घ्या