Sharad Pawar | शरद पवारांनी मागितली अमरावतीकरांची माफी, म्हणाले 5 वर्षापूर्वी लोकांनी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar | अमरावतीमधील (Amravati Lok Sabha) महायुतीच्या (Mahayuti) भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना मागील लोसकभा निवडणुकीत उमेदवारी देऊन आपण चूक केली, त्यांच्यासाठी मते मागितली. याबद्दल आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे. मी ५ वर्षापूर्वी केलेल्या एका चुकीबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्यासाठी आलो आहे, असे शरद पवार जाहीरपणे म्हणाले.(Sharad Pawar)

अमरावती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे, यशोमती ठाकूर, तसेच महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, मी इथे आलोय तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की, माझ्याकडून एक चूक झाली. ५ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला.

आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना अमरावतीकरांनी खासदार केले.
५ वर्षांचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावे आणि अमरावतीकरांना सांगावे की,
आमच्याकडून चूक झाली. ही चूक आता पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे,
असे म्हणत शरद पवारांनी नवनीत राणांवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, देशातील सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात आहे.
गेली दहा वर्षं आपण बघत आहोत. अनेक ठिकाणची त्यांची भाषणे ऐकत आहोत.
काय सांगतात ते हल्ली? जवाहरलाल नेहरू नंतरच्या सर्व पंतप्रधानांच्या कामाची पद्धत आम्ही पाहिली.
आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतात. काँग्रेसवर टीका करतात, अशी टीका पवार यांनी मोदींवर केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Anant Geete On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? शिवसेना नेते अनंत गीतेंनी केला गौप्यस्फोट, ‘या’ बड्या नेत्याचं नाव घेतल्याने खळबळ!

Mahavir Jayanti | महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा; मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी