Sharad Pawar | शरद पवार बनले ‘डॉक्टर’, सन्मान समर्पित केला देशातील शेतकर्‍यांना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावापुढे आता डाॅक्टर ही पदवी लागणार आहे. कारण शरद पवार यांना मानद डॉक्टरेट (Doctorate) प्रदान करण्यात आली आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारंभ आज (गुरूवारी) पार पडला. यावेळी पवार यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

 

खा. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कृषी क्षेत्रासाठी योगदानाची दखल घेऊनच हा पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आला, त्यामुळेच शरद पवारांना शेतकऱ्यांचा नेता असेही संबोधले जाते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शेती संदर्भातील विविध समित्या आणि खात्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. विशेष म्हणजे भारताचे कृषीमंत्री म्हणूनही त्यांनी 10 वर्षे काम केलं आहे.

 

या सन्मानाबद्दल शरद पवार यांनी बहुमानासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आभार मानले आहेत.
त्याचबरोबर पवार यांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.
त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या
महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून (Mahatma Phule Agricultural University) हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो.
तसेच, देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं, त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो. असं ते म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar became doctor honor dedicated farmers country in ahmednagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती; 1 लाख 25 हजार रुपये मिळणार पगार

Pune Crime | एम.जी एन्टरप्रायजेस कडून गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक, सोमजी दाम्पत्यावर FIR

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी