Sharad Pawar | ‘देशातील सर्व शक्ती एकवटल्याने गुजरातमध्ये BJP आल्याचे नवल नाही; दिल्ली, हिमाचलमध्ये भाजप हरला’ – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. या मतमोजणीत दुपारीच सर्व चित्र स्पष्ट झाले होते. भाजपने गुजरातमध्ये बाजी मारली आहे, तर हिमाचल प्रदेश पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आला आहे. या निवडणुकीवर आणि निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी केंद्राची पूर्ण ताकद लावण्यात आली. गुजरातमध्ये भाजपाच्या बाजूने निकाल लागला, म्हणजे देशात एकाच बाजूने मतप्रवाह जातोय असे नव्हे, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी भाजपला विजयाने हुरळून जाण्याचे काही कारण नाही, अशा शब्दांत त्यांचा समाचार घेतला आहे. पवार म्हणाले, गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. देशातील सर्व शक्ती त्या निवडणुकीसाठी वापरली गेली. एका राज्याच्या सोईचे अनेक निर्णय घेतले गेले. अनेक प्रकल्प या राज्यामध्ये कसे जातील, याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर होणारच होता. गुजरातमध्ये तसाच निकाल लागला आहे. मात्र, गुजरातचा निकाल भाजपच्या बाजूने लागला म्हणजे देशातील लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातोय, असे काही नाही. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची महापालिका निवडणूक आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक आहे, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
दिल्ली महापालिकेची सत्ता भाजपकडे होती. आता तिथे आपने झेंडा गाडला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये अगोदर भाजपची सत्ता होती. काँग्रेसने यशस्वीरित्या हिमाचल जिंकला आहे.
हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील भाजपचे राज्य गेले आहे. याचा अर्थ हळूहळू सर्व काही बदल होत आहेत.
राजकारणामध्ये पोकळी असते. गुजरातची पोकळी ही भाजपने भरून काढली, तर दिल्लीची पोकळी केजरीवाल यांनी भरून काढली.
आज लोकांना बदल हवा आहे. याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असे मत पवार यांनी नमूद केले.
Web Title :- Sharad Pawar | sharad pawar comment on himachal pradesh and gujarat assembly election 2022 result
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना
Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…