Sharad Pawar | ‘मेट्रोचं काम झालं नसतानाही उद्घाटन’; शरद पवारांचा PM मोदींना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उद्या पुणे (Pune) दौरा आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन करणार आहेत. मात्र यावरून महाविकास आघाडी सरकारचे (Maha Vikas Aghadi Government) शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी मोदींना टोला लगावला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम असतील तर तक्रार करण्याचं कारण नाही. मेट्रो सुरू करणार आहेत मात्र मेट्रोच्या प्रमुखांनी मला एक महिन्यापुर्वी मेट्रो दाखवण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी मेट्रोतून प्रवासही केला तेव्हा मेट्रोचं काम पूर्ण झालं नसल्याचं माझ्या लक्षात आलं. आता काम झालेलं नसतानाही उद्घाटन होत आहे, याबाबत माझी काहीही तक्रार नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

 

पंतप्रधान मोदी सुधारणेच्या कार्यक्रमाला येत आहेत मात्र नदी सुधारणेचा (Pune River Rejuvenation Project) कार्यक्रम मर्यादित ठेवत आजुबाजूला सोईसुविधा करतात. मी इंजिनिअर (Engineer) नाही पण वर किती धरणे आहेत हे मला माहित आहे. उद्या जर ढगफुटी (Cloudburst) झाली आणि नदीतील पात्र कमी केले तर त्यातील पाणी कुठे जाईल याची चिंता माझ्यासारख्यांना आहे. पंतप्रधान येत आहेत म्हणजे त्यांनी विचार केला असेल असं मी समजतो. जर संकट आलं तर आजूबाजूच्या गावांना याचा फटका बसेल, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

 

दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी बोलताना नवाब मलिक (Nawab Malik) प्रकरणावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला.
नारायण राणे (Narayan Rane) यांनाही अटक करण्यात आली होती.
त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला का, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar criticism of pm modi visit to pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा