Sharad Pawar | MIM च्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयएमने (MIM) महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) येण्याचा प्रस्ताव आघाडीला दिला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एमआयएमच्या प्रस्तावानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एमआयएमसोबत युती (Alliance) होणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

शरद पवार (Sharad Pawar) बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पवार यांना एमआयएमच्या प्रस्तावावर विचारले असता त्यांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात. मात्र ज्यांच्या सोबत जायचे आहे, त्या पक्षांनी तर होय म्हटले पाहिजे. आणि हा राजकीय निर्णय आहे. हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता (Maharashtra) कोणी प्रस्तावित केला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारच्या राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या संबंधिचा निर्णय घेऊ शकता हे तो पर्यंत राष्ट्रीय समितीने स्पष्ट केले नाही, तो पर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकत नाही. अशा प्रकारचा कोणताही निर्णय नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री म्हणाले, एमआयएम भाजपची बी टीम (B Team) आहे. एमआयएमसोबत युती होणार नाही.
विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिले पाहिजे.
विरोधकांची हवा पहिल्या पेक्षा कमी झाली आहे. लोकांनाही विरोधकांचे डावपेच लक्षात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी खासदारांना दिले आहेत.

शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार-इम्तियाज जलील
खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) म्हणाले, खासदार असून मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही हे कुणी सांगेल का?
हिंदुत्ववादी गाजावाजा किती वेळ करणार? तुम्हाला राज्याची चिंता नाही का? तुम्ही सगळ्यांचे मुख्यमंत्री आहात.
आम्ही मिशन घेऊन आता बाहेर पडलोय. आम्ही महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत राहणार.
भाजप या देशासाठी सर्वात घातक पक्ष आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाजपा समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करते.
एका सिनेमाचं प्रमोशन (Movie Promotion) भाजप करतेय. त्यामुळे आघाडीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
लवकरच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. भेटून यावर चर्चा करु असं जलील यांनी सांगितलं.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar has clarified the possibility of aimim joining the alliance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Builders’ Association of India (BAI) | बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे रावसाहेब सूर्यवंशी यांना ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के जीवनगौरव पुरस्कार-निर्माण रत्न’ प्रदान (व्हिडिओ)

 

Multibagger Stock | 10 पैशांच्या जबरदस्त स्टॉकने गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले 57 कोटी रुपये, दिला 5 लाख टक्के भरभरून रिटर्न

 

MP Imtiaz Jaleel | ‘केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करु नका, तुमच्यापेक्षा आम्ही जास्त आदर करतो’ – खा. इम्तियाज जलील