Sharad Pawar | उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो – शरद पवार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर राज्यात वादंग सुरू आहेत. भाजपच्या अनेक मंडळींनी ही वादग्रस्त विधाने केली होती. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा देखील समावेश आहे. त्यावर महाविकास आघाडीने तीव्र विरोध केला आहे. मात्र, भाजपने सर्वांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे एकमेव नेते, खासदार उदयनराजे भोसले या सर्वांच्या विरोधात पक्षाची शिस्त मोडीत काढून विरोधी भूमिका घेत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

उदयनराजे भोसलेंनी घेतलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) कौतुक केले. पवार म्हणाले, भोसलेंनी चांगली भूमिका घेतली आहे. त्यांच्याबद्दल आम्हा लोकांना समाधान आहे. पण या सर्वात राज्य आणि केंद्र सरकाराची भूमिका बघ्याची आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले उद्गार चुकीचेच होते. आज ना उद्या केंद्र सरकारला त्यांच्याबाबत निर्णय घ्यावाच लागेल, अशी मला खात्री आहे. लवकरच तो बदल झालेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल.

राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींच्या विधानानंतर भोसलेंनी रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तसेच भोसलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलेल्या पुणे बंद या आंदोलनाच्या वेळी देखील भोसलेंनी थोडा वेळ उपस्थिती लावली होती.
त्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेत शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून भूमिका मांडली होती.
त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रोटोकॉल तपासून कारवाईची मागणी केली आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar react on udayanraje bhosale over governor koshyari statement chhatrapati shivaji maharaj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MVA Mahamorcha | अखेर पोलिसांनी महामोर्चाला दिली परवानगी, शरद पवार म्हणाले- ‘एकनाथ शिंदेंनी सांगितले होते…’

Vivek Oberoi | ऐश्वर्या राय आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल अखेर विवेकने केला ‘हा’ मोठा खुलासा

Sushma Andhare | ‘मी पक्षाने सांगितले, तर राजीनामा देण्यास तयार आहे, पण…’ – सुषमा अंधारे