Sharad Pawar | खुद्द शरद पवारांनी कार्यकर्त्याच्या हाताला धरून बसवले खुर्चीत, म्हणाले – बस इथं..! (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. राजकारणात कार्यकर्ता किती महत्वाचा असतो, हे अधोरेखीत करणारी कृती पवार (Sharad Pawar) यांनी केली. एका सामान्य कार्यकर्त्याला शरद पवारांनी कार्यालयातील खुर्चीवर हात धरुन बसवले. आपल्या मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत हा कार्यकर्ता खुर्चीवर बसण्यास तयार नव्हता. पण पवारांनी त्याच्या हाताला धरले आणि बस इथं म्हणत जबरदस्तीने, प्रेमाने खुर्चीत बसवले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

शरद पवार (Sharad Pawar) सोमवारी पुरंदर दौर्‍यावर असताना त्यांनी तालुक्यातील पर्रिचे येथील शेतकरी संवाद कार्यक्रमापूर्वी पुष्कराज जाधव (Pushkaraj Jadhav) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. पुष्कराज जाधव यांनी शरद पवारांना कार्यालयातील मुख्य खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी पुष्कराज जाधव यांना स्वतःच्या हाताने धरले. त्यांच्या दंडाला पकडून खुर्चीपर्यंत आणले आणि खुर्चीवर बसवले.

 

 

पवारांची ही कृती उपस्थित कार्यकर्त्यांना सुखावून गेली. सोशल मीडियामध्ये शरद पवारांच्या या कृतीचे विशेष कौतुक होत आहे.
हा प्रसंगाचा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावरुन पोस्ट केला आहे. मोठ्या संख्येने युजर्स तो व्हिडीओ शेअर करत आहेत.

 

शरद पवार यांच्या सुरक्षा रक्षकांनीही कार्यकर्त्याला खुर्चीत बसवण्यासाठी हातभार लावला.
यानंतर शरद पवार यांनी इतर सर्व मंडळींसह फोटोही काढला.
राजकारणात खुर्चीचे महत्त्व फार असले तरीही खुर्ची नाकारत शरद पवारांनी ती कार्यकर्त्याला दिली.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar refuse to sit on chair and forced his worker to sit on the same chair watch video in purandar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना मनसेचा सवाल, पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला अमानुष मारहाण केल्यावर आता गप्प का?

Bhaskar Jadhav | 100 रुपयांच्या शिधावरुन भास्कर जाधवांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदार भाजपमध्ये जाणार? राष्ट्रवादीचा मोठा दावा