Sharad Pawar | ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांचा राज्यपालांना खोचक टोला, म्हणाले – ‘कधीकधी पदावर बसलेल्या…’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन (Offensive Statement) राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांच्या या विधानाचा सत्ताधाऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला. या पार्श्वभूमीवर रष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील राज्यपालांच्या विधानाचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे. कधीकधी पदावर बसलेल्या लोकांना सुद्धा पद आणि अधिकार यांचं तारतम्य राहत नाही, असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यापालांवर निशाणा साधला.

 

उस्मानाबद येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार (Central Government) घसरुन कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळत आहे. ज्या पदाची प्रतिष्ठा अनेकांनी सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेऊन कोणी काम करत असेल त्याच्यावर भाष्य न केलेले बरे, असे पवार म्हणाले.

 

शरद पवार पुढे म्हणाले, कधीकधी पदावर बसलेल्या लोकांनासुद्धा पद आणि अधिकार यांचं तारतम्य राहात नाही. महाराष्ट्रात कुणीतरी भाषण केलं की छत्रपती मोठे नव्हतेच, कुणीतरी दुसऱ्यांनीच त्यांना मोठं केलं. त्यांनी सावित्रीबाई फुलेंबद्दलही भाषण केलं. लोक म्हणाले आता काय करायचं? म्हटलं सोडून द्या ना. काय कुणी विचारणार नाहीये. नको ते बोलल्यानंतर लोक म्हणतात उगीच याच्या नादी लागायला नको. यात काही दम नाही. यात काही अर्थ नाही. याच्याकडून नीट काही बोललं जाणार नाही. म्हणून त्याचा विचार करण्याचं कारण नाही, असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज पुण्यातील कार्यक्रमात बोलताना राज्यपालांच्या विधानावर
अप्रत्यक्ष शब्दांत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधानांकडेच तक्रार केली. पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो.
अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत.
ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत.
मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे,
हे मी नम्रतापूर्वक सांगतो, असे अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar slams governor bhagat singh koshyari on shivaji maharaj and Krantijyoti Savitribai Phule statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramdas Athawale In Pune | …म्हणून मलाही पुण्यात राहायला यावेसे वाटतेय – रामदास आठवले

 

Gajanan Marne | कुख्यात गजानन मारणेची जेलमधून वर्षभरानंतर सुटका; जाणून घ्या प्रकरण

 

Narayan Rane | ‘त्या’ प्रकरणात नारायण राणे, नितेश राणेंची 9 तास चौकशी