Sharad Pawar | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, लढणार की शिवसेनेला पाठिंबा? केले स्पष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latke) यांच्या निधनामुळे मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा (Andheri Assembly By-Elections) कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप (BJP) किंवा शिवसेना विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) अशी लढत होऊ शकते. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीची (NCP) भूमिका काय असणार, अशी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केला आहे. आता सर्वांचे लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले आहे.

 

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे 2014 मध्ये काँग्रेसकडे आघाडीसाठी प्रस्ताव घेऊन आले होते, अशी वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Congress leader Ashok Chavan) यांनी केले होते. यावर शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, आमच्याकडे 2014ला कोणीच प्रस्ताव दिला नाही. राष्ट्रवादीला कोणी प्रस्ताव दिला असेल तर त्याची मला माहिती मिळाली असती. निर्णय घेण्याचा आमच्या नेत्यांना अधिकार आहे. पण कमीत कमी ते माझ्या कानावर घालतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीच ऐकले नाही.

मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसीतून (OBC) आरक्षण (Reservation) द्याव अशी मागणी आहे त्यांवर राष्ट्रवादीची भूमिका काय? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही. निर्णय राज्य सरकारने (State Government) घ्यावा.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो रॅली महाराष्ट्रात येणार आहे, या रॅलीत सहभागी होणार का?
असे विचारले असता पवार म्हणाले, भारत जोडो हा कार्यक्रम काँग्रेसचा आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आहे.
त्यांच्या पक्षातील नेते त्यात सहभागी होतील. त्यांच्या कार्यक्रमात इतर पक्षांनी सहभागी व्हावे असे नाही.
तशी आम्हाला काही सूचना आलेली नाही.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar support shivsena for andheri east by election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राज्यात दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी, शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

Legends League | LIVE मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनकडून युसूफ पठानला धक्काबुक्की

Ind vs SA T20 | चक्क अम्पायरच नियम विसरले, गुवाहाटीत अम्पायर्सने केली ‘ही’ मोठी चूक