शरद पवारांनी गडकरींच्याच विरोधात लढावे…

नागपुर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी गडकरींच्या विरोधात नागपुर मतदार संघातून लोकसभेची निवडणुक लढावी ,असे आव्हान भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख व बहुजन वंचित आघाडीचे प्रणेते अँ.प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील कार्यक्रमात केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भविष्यात पंतप्रधान होतील ,असा प्रचार राष्ट्रिय स्वयंसेवक संघाकडुन करण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. नितीन गडकरी यांच्या विरुध्द आघाडीकडे सक्षम असा उमेदवार नसुन,रा.स्व.सं कडून पंतप्रधानपदासाठी गडकरी यांचा प्रचार चालु आहे. गडकरी यांच्या कामाचे कौतुक कॉग्रेस पक्षातील नेते मंडळी करतात. तसेच नितीन गडकरी हे स्वतः पंडीत नेहरू यांच्या धोरणांचा गुणगौरव करतात.

यामुळे कॉग्रेस व भाजपामध्ये साटेलोटे असल्याची शंका निर्माण झाली आहे. या शंकाचे निवारण करण्यासाठी कॉग्रेस पक्षाने एखादा बडा नेता निडणुकींच्या रिंगणात उतरावा.कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी द्यावी अन्यथा शरद पवार यांनी त्यांच्या विरोधात निवडणुक लढवावी, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

चंद्रपूर येथील कार्यक्रमानिमित्त येथे आले असता पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी महाआघाडीचा पर्याय आणखी दोन दिवस खुला असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही व जातीय मतांचे राजकारण सुरू आहे.आमचा महाआघाडीत समावेश करण्यासाठी कॉग्रेसला दिलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. संघाबाबत कॉग्रेसने गुरुवार पर्यंत भूमिका स्पष्ट करावी.नाही तर एक मार्च रोजी वंचित आघाडीच्या सर्व 48 उमेदवारांची घोषणा करण्यात येईल,असा ईशाराही त्यांनी दिला.

शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या युतीचा उभय पक्षांना नक्कीच फटका बसणार आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपचे आणि भाजपच्या मतदारसंघात सेनेचे असलेले क्षेत्र एकदाचे संपुष्टात येईल,असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबुत केल्याबद्दल आंबेडकर यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. असे ही  आंबेडकर म्हणाले.