Sharad Pawar-Silver Oak Attack Case | गुणरत्न सदावर्तेंना ‘कॉल’ करणारी नागपूरमधील ‘ती’ व्यक्ती कोण ? कोर्टात सुनावणीच्या वेळी दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar-Silver Oak Attack Case | गेल्या 5 महिन्यांपासून सुरू अससेल्या एसटी संपामधील कर्मचारी वर्गामधील एका गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला (Sharad Pawar-Silver Oak Attack Case) केला. या प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली होती. सदावर्तेंची पोलीस कोठडी आज संपत असून न्यायालयात सुनावणी चालू आहे. या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

 

शरद पवारांच्या घरावर हल्ला (Sharad Pawar-Silver Oak Attack Case) होण्याआधी एक बैठक झाली होती.
त्या बैठकीतच या हल्ल्याचं नियोजन ठरलं होतं. अभिषेक पाटील (Abhishek Patil) नावाचा कर्मचारी सदावर्तेंच्या संपर्कात होता,
त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावलं. हल्ला झालेल्या दिवशी सदावर्ते यांनी सकाळी नागपूरला (Nagpur) एक कॉल केला तो फोन कोणाला केला हे शोधून काढायचं असल्याचं अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सांगितलं.

 

सदावर्ते यांच्या फोनवरून 31 मार्चला बोलणं झालं त्यांनी ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते सिमकार्ड नष्ट केलं.
हल्ल्याच्या दिवशी 11.35 ला व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला होता आणि त्यानंतर परत एकदा 1.30 वाजता आणखी एक फोन झाला त्यामध्ये पत्रकारांना पाठवा, असं बोलणं झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

दरम्यान, सदावर्ते हे चौकशीला पुर्णपणे सहकार्य करत नाहीत. सदावर्तेंनी नागपूरला कोनाला फोन केला ?,
त्यासोबतच संप जवळपास सहा महिने सुरू आहे त्यामुळे यासाठी पैसे कुठुन येताहेत हे शोधुन काढायचं असल्याचं प्रदीप घरत यांनी न्यायालयात सांगितलं.

 

Web Title :- Sharad Pawar-Silver Oak Attack Case | gunaratna sadavarte called whom who was that nagpur person court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा