Sharad Pawar-Silver Oak Attack Case | सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण ! शरद पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले – ‘एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar-Silver Oak Attack Case | राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कसे अस्थिर होईल यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. देशात सत्ता आहे पण महाराष्ट्रात सत्ता नसल्याने रोज नवनवीन षडयंत्र रचले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे खेळणे करून ठेवले आहे. घरावर झालेला हल्ला त्याचेच द्योतक आहे. एसटी कामगारांच्या (MSRTC Workers) खांद्यावर बंदूक ठेऊन विरोधकांनीच हा हल्ला घडवला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. (Sharad Pawar-Silver Oak Attack Case)

 

अमरावतीत (Amravati News) रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसची विभागीय संवाद बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane), माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse), माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (Subodh Mohite) आदी उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांनी अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (Punjabrao Deshmukh Memorial Medical College) परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. (Sharad Pawar-Silver Oak Attack Case)

शरद पवार म्हणाले, ”देशात बेरोजगारी, महागाई यांसारखे अनेक प्रश्न आहेत. यावरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 40 वर्षांपासून एसटी कामगारांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. घरावर जो हल्ला झाला त्यासाठी मी कामगारांना दोष देणार नाही. त्यांना भडकवले गेले कारण नेतृत्त्व चुकीचे होते. मी अनेक संकटे जवळून पाहिली आहेत. मुंबईचा बॉम्बस्फोट असो वा किल्लारीचा भूकंप. मुंबईत दंगली झाल्या तेव्हा हिंदू व मुस्लीम भागातही जाऊन भेटी घेतल्या. अलीकडे मात्र एका चित्रपटाच्या नावाने सांप्रदायिक शक्तीकडून हिंदू समाजात अस्वस्थता पसरवण्याचे काम सुरू आहे. संविधानावर विश्वास असलेल्या विचारसरणींनी एकत्रित यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

 

रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar Nagpur International Airport) आगमन झाले.
यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होईल,
अशी अपेक्षा होती; परंतु मोठे पदाधिकारी व निवडक कार्यकर्ते दिसून आले. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस बंदोबस्तातच पवार अमरावती कडे रवाना झाले.
मुंबईत पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Web Title :- Sharad Pawar-Silver Oak Attack Case | ncp chief sharad pawar allegation on bjp over msrtc workers issue and silver oak attack case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा