पार्थ पवार यांच्या पराभवावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकांच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. यंदाच्या निवडणुकीत पवार घराण्यातील खंदे उमेदवार बारामतीतून सुप्रिया सुळे आणि मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना उभे केले होते. मात्र सुप्रिया सुळे १ लाख मतांनी निवडून आल्या तर पार्थ पवार एक लाख मतांनी पराभूत झाले. पार्थ यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “मावळातील जागा ही न येणारीच होती. मागील निवडणुकीत देखील मावळात आमचा उमेदवार आला नव्हता. न येणाऱ्या जागेवर प्रयत्न करावा म्हणून आम्ही मावळ मतदार संघातून पार्थ यांना उमेदवारी दिली’. असे शरद पवार म्हणाले.

माढ्यात निवडणूक लढणार नव्हतोच

नातवासाठी शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली. मात्र पार्थ यांचा पराभव झाला. याबाबत विचारले असता पवार म्हणाले “माढ्यात लढण्याचा प्रश्नच येत नाही. मी २०१४ सालीच संगितले होते की मी थेट निवडणुकीत सहभाग घेणार नाही. माढ्यातून मी पार्थसाठी माघार घेतली ही वस्तुस्थिती नव्हतीच असा ‘यु टर्न’ शरद पवार यांनी घेतला.

मावळातील जागा येणार नव्हतीच

तसेच पार्थ यांच्या उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मावळातील जागा ही न येणारीच होती. मागील निवडणुकीत देखील मावळात आमचा उमेदवार आला नव्हता. न येणाऱ्या जागेवर प्रयत्न करावा म्हणून आम्ही मावळ मतदार संघातून पार्थ यांना उमेदवारी दिली. मावळ मतदार संघात राष्ट्रवादीचा व्यास वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही पार्थला उभे करून प्रयत्न केला. मात्र मावळ मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली”.

याबरोबरच यावेळी बोलताना जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे असे पवार म्हणाले पण त्यांनी ईव्हीएम बाबत अजूनही लोकांच्या मनात संशयाचे भूत आहे असे वक्तव्य केले.