‘हे बरं नव्हं’, उदयनराजेंना टोला ! नेमकं काय म्हणाले शरद पवार हे जाणून घ्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज साताऱ्यात मोठे शक्ती प्रदर्शन केले. शक्ती प्रदर्शनानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उदयनराजे यांच्यावर निषाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीच्या दरबारात अपमान झाला. त्यानंतर राजे त्या दरबारातून निघून गेले आणि आता ? मी एवढच म्हणेन हे बरं नव्हं. अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंना टोला लगावला.

उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. उदयनराजे यांच्याबद्दल शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शरद पवार यांनी आपल्या भाषणात उदयनराजे भोसले यांचा उल्लेख न करता त्यांना लक्ष केले. तसेच आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या विजयचा गुलाल उधळण्यासाठी मला पुन्हा बोलवा असे आवाहन त्यांनी कार्य़कर्त्यांना केले.

शरद पवार यांनी कार्य़कर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, राज्यात दुष्काळ असताना, राज्यकर्ते दुष्काळ आणि महापुराकडे दुर्लक्ष करत आहेत. दुसरीकडे किल्ल्यांवर स्वाभिमानाचा इतिहास घडला त्या ठिकाणी ह़ॉटेल आणि बार उभ करण्याचे नियोजन सरकार करीत आहे. एकेकाळी पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले होते. दरबारात सन्मान होईल, असा शब्द दिला होता. पण महाराज दिल्लीत गेल्यानंतर दरबारात त्यांना मागे बसवले. महराज तेथून बाहेर पडले. त्यांना नजरकैदेत ठवेले तेथूनही ते सुटले आणि महाराष्ट्रात येऊन इतिहास घडवला. यानंतर आणि आता ? असा प्रश्न विचारताच सभागृहात हशा पिकला. त्यावर हे वागणं बरं नव्हं असे म्हणत उदयनराजे यांना टोला लगावला.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like