Sharad Pawar | आंदोलकांनी घटनेपूर्वी शरद पवार यांच्या घराची केली रेकी?; CCTV फूटेजमधून माहिती समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी संपकरी एसटी कामगारांनी (ST Workers) काल आंदोलने केली आहेत. त्यावेळी कामगारांकडून (MSRTC Workers) चप्पल, दगडफेक देखील करण्यात आली. याचे पडसाद आता राज्यभर उमटत असतानाच आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. एसटी कामगारांच्या एका गटाने शरद पवारांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यापूर्वी त्यांच्या घराची रेकी (Reki) केल्याचे समजते. निवासस्थानी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेराद्वारे ही बाब समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Mumbai Police)

 

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराजवळ केलेलं आंदोलन हा सर्व मोठा कट होता. त्यामुळे या परिसराची आधी रेकी केली होती. या परिसरातील आणि आझाद मैदानातील काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. गुन्हे नोंद करण्यात आलेल्या 109 लोकांपैकी काही लोकांची हालचाल ही शरद पवारांच्या निवासस्थानाच्या परिसरात आधीच दिसून आली होती. असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.

 

दरम्यान, एसटी कामगारांच्या एका गटाने शरद पवार यांच्या घर परिसरात आंदोलने केलीत. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात घोषणाबाजी करत घुसखोरी केली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, या परिसरातील गाड्यांमध्ये काही लोकांची संशयास्पद हालचाल दिसून आली आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.

 

Web Title :- Sharad Pawar | st strike sharad pawar silver oak attack protesters did reiki disclosure from cctv

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा