शरद पवारांनी भाषण सुरु करताना प्रथम वाहिली पर्रीकरांना श्रद्धांजली 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी येथे आयोजित सभेत बोलतांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेतील भाषण थांबवून मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली.

मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली असता, त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पिंपरी येथे सभेचे आयोजन केले होते. दरम्यान सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करत असतांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले असल्याचे वृत्त त्यांना कळाले त्यावेळी सभेतील भाषणथांबवून शरद पवार यांनी मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली.

भाषण चालू असतांनाच अतिशय दुःखद बातमी कानावर आली, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे.  यांच्या निधनानंतर मला खूप दुःख झाले आहे. आम्ही एक सक्षम आणि मेहनती नेता गमावला आहे. ज्यांनी आपले साधे आचरण आणि विलक्षण बुद्धीने आपले कार्य केले. माझ्या वतीने आणि संपूर्ण पक्षाच्या वतीने मी पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहतो. असे म्हणत शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

इतकेच नव्हे तर, गोव्याचे मुख्यमंत्री, कायम माणसांत रमलेला नेता, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यांचे गोवा आणि देशासाठीचे योगदान अमूल्य आहे. त्यांची पोकळी नेहमीच जाणवेल. भावपूर्ण श्रद्धांजली. अश्या शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली.

You might also like