केंद्रातील भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांनी सुचवला ‘नवा पॅटर्न’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आता तिन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत भाजपला रोखण्याचे. लोक आता नवा पर्याय शोधत आहेत समान किमान कार्यक्रमावर एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर हे तो होऊ शकेल असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

एकच पक्ष पर्याय देऊ शकेल अशी सध्या अवस्था नाही –
शरद पवार म्हणाले की देशातील आताची परिस्थिती पाहिली तर कुठलाही एक पक्ष पर्याय देऊ शकेल अशी अवस्था नाही. त्यामुळे इतर राज्यातही असे वातावरण आहे. आज लोक एक पर्याय शोधत आहेत. तो पर्याय कुठला तरी एक पक्ष देईल, अशी अवस्था देशात मुळीच नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकेल, असा एक विश्वास जानकारांच्या मनामध्ये आहे आणि त्यादृष्टीने लोक महाराष्ट्राकडे बघत आहे असे सांगत त्यांनी आपले राजकीय संकेत दिले.

पवार म्हणाले की देशात आपल्या महाराष्ट्राचा पॅटर्न वापरला जेईल की नाही माहित नाही परंतु झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की महाराष्ट्रात काय घडलं आणि शरद पवार यांनी जे काही केलं ते आम्हाला प्रेरणादायी आहे. असाच विचार आता सगळ्यांनी करायचा असं ठरवलंय, काल मला ममता बॅनर्जींचे पत्र मिळेल त्यांनी इतर पक्षांची बैठक बोलावली आहे.

खातेवाटपाला होणाऱ्या विलंबाचा देखील त्यांनी खुलासा केला. राज्यात खातेवाटपावरुन कोणत्याही पक्षात नाराजी नाही. खातेवाटपाचा विषय आठ दहा दिवसांपूर्वी झाला असून त्या पक्षाने कुणाला कुठलं काम करायचं आहे हे ठरवायला हवं याचा निर्णय आज उद्या होईलचय. राष्ट्रवादी देखील कोणताही वाद नाही. उलट आम्हीच म्हणतोय की खाते घ्या, मंत्रिपद नको. सरकारमध्ये खात्यावरुन घोळ नाही. खात्याबाबत सर्व निर्णय झाले आहेत. उद्या मुख्यमंत्री देखील या संबंधित निर्णय जाहीर करतील.

मी अनेकदा मंत्री होतो. खातेवाटप झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की आम्हाला काय काम करायचं. आता तर तीन पक्ष आहेत. सुदैवाने आता 8 दिवसांपूर्वी ठरलं आहे. आता पक्षांनी ठरवायचं आहे की कोणत्या मंत्र्याला कोणती खाती द्यायची. आम्ही आता नव्या पिढीला संधी देणार आहोत आणि नव्या पिढीला जास्त काम देणार आहोत असे ही पवार यांनी सांगितले.

त्रिपाठींच्या आठवणीला उजाळा –
डी पी त्रिपाठी राष्ट्रवादीचे राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचे लौकिक हिंदीतील अत्यंत विद्वान उत्तम लेखक आणि विचारवंत. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना त्यांना त्यांचे सहकारी म्हणून कामं केलं. शासकीय कामाबरोबरच इतर देशांच्या कामावर सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातील महत्वाच्या देशांशी राजीव गांधींचे मेसेंजर म्हणून संपर्क साधण्याचे काम करत. पाकिस्तानचे पंतप्रधान असो वा इतर देशांचे पंतप्रधान किंवा मंत्री, सर्वांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. भारताच्या पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून महत्वाच्या भूमिकांवर पार्श्वभूमी तयार करण्याचे महत्वाचे काम ते करत.

मागील सहा महिन्यापासून ते आजारी हेते आणि रुग्णालयात उपचार घेत होते. गेल्या आठवड्यात त्यांचा मला निरोप आला होता, राज्यात झालेल्या सत्ताबदलावर त्यांना माझ्याशी बोलायचे होते. त्यांना महाराष्ट्रातील पॅटर्न इतर राज्यात राबवू शकतो का यासंबंधित माझ्याशी सविस्तर चर्चा करायची होती. तेव्हा मी त्यांना तब्येतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता, परंतु दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. ते अत्यंत सुस्वभावी, भाषेवर प्रभुत्व असे व्यक्तिमत्व होते.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/