Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, शिवसेना की शिंदे गट, शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) धनुष्यबाण चिन्हाचा (Dhanushaban Symbol) वाद सध्या निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुरू आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे भवितव्य आता निवडणूक आयोगाच्या हातात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक सूचक विधान केले आहे. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

 

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर प्रतिक्रिया देताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, याबाबत मला काही सांगायचे कारण नाही. निवडणूक आयोग यासंबंधीचा निर्णय घेईल आणि निकाल देईल. शेवटी निवडणूक आयोगाने दिलेला निकाल कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल.

 

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती.
काल शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचे सिद्ध करण्यासाठी सुमारे 7 लाख शपथपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आजपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आता आज उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय कार्यकारिणीतील 180 जणांची शपथपत्रे सादर केली जाऊ शकतात.
शिवसेना कदाचित अधिक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागू शकते.

 

Web Title :- Sharad Pawar | the fate of shivsenas dhanushya baan is in the hands of election commission sharad pawars big statement said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Udayanraje On Govt Officers – Satara News | “काम नाही केलं, तर वाडगं घेऊन..”, उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

Pakistan Vs India | पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावून देखील भारत अव्वल स्थानी कायम

Pune Crime | ब्रेकअप झाल्यावर तिला धडा शिकवण्यासाठी युट्युबवरून चोरी करायला शिकला; 14 लाखांवर मारला डल्ला