कोणासोबतही ‘सरकार’ बनवण्यावर ‘चर्चा’ नाही, सोनिया गांधींसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांनी सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम राहण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाशिवआघाडीचा सत्तास्थापनेवरुन पेच असल्याचे संकेत मिळाले. यावेळी शरद पवार म्हणाले की आघाडीतील मित्र पक्षांबरोबर चर्चा झाली नाही. ते आमच्यासोबत विधानसभा निवडणूक लढले आहेत. आघाडीतील मित्र पक्षांना आम्ही नाराज करु शकत नाही. त्यांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घेण्यात येईल. तसेच सरकार बनवण्यावर अजून चर्चा झाली नाही.

पवार पुढे म्हणाले की शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबात चर्चा झाली नाही. सरकार स्थापनेबाबत सोनिया गांधीशी चर्चा झाली नाही. पवारांच्या या विधानाने महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेचा सस्पेन्स वाढला आहे.

राष्ट्रवादीचे आम्हाला समर्थन आहे असे शिवसेनेकडून का सांगण्यात येते हे मला माहित नाही असे ही पवारांनी स्पष्ट केले. तसेच एकसूत्री कार्यक्रमावर अजून समन्वय समितीची बैठक झाली नाही असेही पवारांनी स्पष्ट केले. सरकार बनवण्यावर अजून चर्चा झाली नाही कारण अजून आमचीच चर्चा सुरु आहे. असे देखील पवारांनी स्पष्ट केले.

पवारांच्या या वक्तव्यमुळे राज्यातील सस्पेन्स वाढत चालला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. परंतू आता लोक वाट पाहत आहे ती स्थिर सरकारची. असे असताना आघाडी आणि शिवसेनेचे अजून काही ठरलेले नाही असे संकेत मिळत आहेत.

Visit : Policenama.com