Sharad Pawar To Eknath Shinde | ‘…तर एकनाथ शिंदेंनाच भारी पडेल’ – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Sharad Pawar To Eknath Shinde | शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी यापूर्वीच योग्य ती राजकीय खेळी करण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदुत्वासाठी सुरू केलेले बंड आता भाजपामध्ये (BJP) विलिन होण्यापर्यंत पोहचले आहे. यानंतर आता भाजपाच्या हालचाली सुद्ध वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Sharad Pawar To Eknath Shinde)

 

त्यांना सत्ता परिवर्तन करायचेय

शरद पवार सध्या दिल्लीत असून येथे त्यांनी बंडखोर शिंदे गटावर टीका करताना म्हटले की, शिंदे ज्या राष्ट्रीय शक्तीचा उल्लेख करत होते, ती भाजपाच तर आहे, दुसरी कोणती शक्ती आहे? त्यांना सत्ता परिवर्तन करायचे आहे, यामुळे हे प्रकार सुरू आहेत. (Sharad Pawar To Eknath Shinde)

 

पवार पुढे म्हणाले की, मी राज्यातील चर्चेसाठी दिल्लीत आलेलो नाही, तर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी अर्जासाठी आलो आहे. शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांनी नव्या युतीबाबत चर्चा केली आहे. परंतु आम्हाला शिवसेनेने भेटून सरकारला पाठबळ असल्याचे सांगितले आहे, यामुळे आमचा त्यांना पाठिंबा आहे. तोच कायम ठेवायचा आहे.

 

…तर शिंदेंच्याच प्रयत्नांवर पाणी फिरेल

राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule In Maharashtra) लागू होऊ शकते, अशी चर्चा सुरू असून यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत कोण बोलले माहिती नाही, परंतू असे झाले तर शिंदेंच्याच प्रयत्नांवर पाणी फिरेल. राष्ट्रपती राजवट लागली तर सहा महिन्यांत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. आता त्यांना भाजपाने कोणते आश्वासन दिले, आम्हाला माहिती नाही. गेल्या अडीच वर्षांत त्यांना त्रास झाला नाही, राष्ट्रवादीने त्रास दिल्याचे आताच कसे समजले.

 

राष्ट्रपती निवडणुकीवर भाष्य करताना पवार म्हणाले की, निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवली जाते.
मात्र जेव्हा दोन उमेदवार असतात, तेव्हा दोन्हीही जिंकतील असे होत नाही.
प्रत्येक उमेदवाराची स्थिती वेगळी असू शकते. मात्र, ही तत्वांची लढाई आहे.
विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे.
त्यांना जिंकून आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायला हवेत.

 

Web Title :- Sharad Pawar To Eknath Shinde | if the president rule in maharashtra then shivsena leader eknath shinde and rebel shivsena mlas will suffer sharad pawars warning from delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा