Sharad Pawar To Shinde-Fadnavis Govt | शरद पवारांचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान, म्हणाले – ‘पत्राचाळ प्रकरणी लवकर चौकशी करा, आम्ही तयार’

मुंबई : Sharad Pawar To Shinde-Fadnavis Govt | पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील (Patra Chawl Scam Case) खरे रिंगमास्टर शरद पवार (Sharad Pawar) आहेत, असा आरोप करत भाजपाने पवारांच्या उच्चस्तरीय चौकशीचा इशारा दिला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान दिले. यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पत्राचाळ प्रकरणी लवकर चौकशी करा, आम्ही तयार आहोत. (Sharad Pawar To Shinde-Fadnavis Govt)

शरद पवार म्हणाले, काल माझ्यावर काही आरोप झाले आहेत, त्या बैठकीत पत्राचाळ प्रकरणी काम देण्यात आले या विधानाला काही आधार आहे का. या प्रकरणात आरोप काय आहेत, चौकशी करणारी एजन्सी कोर्टात काय म्हणत आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला स्पष्ट सांगतील. पत्राचाळ प्रकरणी चौकशीला आम्ही तयार आहोत. लवकरात लवकर चौकशी करा, जर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणार्‍यांवर काय भूमिका घेणार हेही राज्य सरकारने जाहीर करावे. (Sharad Pawar To Shinde-Fadnavis Govt)

यावेळी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माहिती देताना म्हटले की, ही बैठक 2006 साली झाली आहे.
हा प्रकल्प 1988 चा आहे. तेव्हापासून प्रकल्प अडकला आहे, यासाठी शरद पवार यांनी बैठक घेतली आहे.
याप्रकरणी चौकशी करा पण पराचा कावळा करु नका.

अतुल भातखळकर यांच्यावर निशाणा साधत जितेंद्र आव्हाड म्हणाले, एखाद्या प्रकरणाचा पराचा कावळा करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. सगळे कागदपत्र सरकारला द्या, सरकार निर्णय घेईल.
हे सगळ करुन शरद पवार यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आम्ही कधीच बेछूट आरोप करत नाही. तुम्ही लगेच या प्रकरणाची चौकशी करा.

Web Title :- Sharad Pawar To Shinde-Fadnavis Govt | ncp leader sharad pawar explained his role in the patra chawl scam case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Decisions | शिंदे-फडणवीस सरकारचं पोलिसांना गिफ्ट ! महाराष्ट्र पोलिसांच्या नैमित्तिक रजेत वाढ, 7231 पदांची पोलीस भरती होणार

Memory Booster | मुलांचा मेंदू होईल सुपर ब्रेन, अवलंबा ‘हे’ 6 जबरदस्त उपाय; मोठ्यांसाठी सुद्धा लाभदायक

High Cholesterol | ‘या’ वयानंतर वाढतो बॅड कोलेस्ट्रॉलचा धोका, ताबडतोब डाएटमधून हटवा ‘हे’ पदार्थ