शरद पवारांचा ‘पावरप्ले’ ! 24 तासात सरकारबाबत 2 ‘विधानं’, शिवसेनेची ‘चिंता’ वाढणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल येऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला आहे, परंतु सरकार स्थापन करण्यासाठी अद्यापही राजकीय उलथापालथ सुरू आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करेल अशी शिवसेनेला आशा आहे. परंतु, गेल्या 24 तासात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी दोन विधाने दिली आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात. शरद पवार सातत्याने सांगत आहेत की सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा नाही.

आज काय म्हणाले शरद पवार ?

शरद पवार मंगळवारी संसद भवनात पोहाचले तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना महाराष्ट्रात सरकार स्थापनेविषयी विचारले. यावर शरद पवार म्हणाले की, ‘मला हे प्रश्न विचारू नका, ज्यांना सरकार स्थापन करायचे आहे त्यांना प्रश्न विचारा.’

काल काय म्हणाले शरद पवार ?

सोमवारी शरद पवार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले तेव्हा महाराष्ट्रात सरकार स्थापनेविषयी निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, या बैठकीत सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
कॉंग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते पुढच्या रणनीतीवर बोलत आहेत. पण सरकार स्थापनेसाठी आमच्याकडे 6 महिने आहेत.

पवारांना समजणे सोपे नाही

सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपाला विचारा असं शरद पवार म्हणाले होते. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की , शरद पवार समजून घेण्यासाठी तुम्हाला 100 जन्म लागतील.राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल.

भाजप सोडून राष्ट्रवादी-कॉंग्रेसबरोबर बसून शिवसेनेची सरकार स्थापनेची प्रतीक्षा वाढतच चालली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत सातत्याने बैठका सुरू आहेत, त्यामुळे महायुतीबाबत कोणताही निर्णय घेण्यात येत नाही.

राष्ट्रवादी-कॉंग्रेसची बैठक तहकूब

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीत दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून पुढच्या रणनीतीवर विचार करतील असा निर्णय घेण्यात आला. ही बैठक मंगळवारी दिल्ली येथे होणार होती, परंतु ही बैठक मंगळवारी दुपारपर्यंत रद्द करण्यात आली. आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आहे, त्यामुळे कॉंग्रेसचे नेतेतिकडे व्यस्त आहेत, म्हणूनच ही सभा रद्द करण्यात आली.

Visit : Policenama.com