Sharad Pawar Vs Ajit Pawar | अजित पवारांच्या ६ आमदारांबाबत शरद पवारांचे प्लॅनिंग; राजकीय सामना रंगणार

Sharad Pawar Vs Ajit Pawar | ncp sharad pawar group shiv swarajya yatra will enter the constituency of 6 mlas of ajit pawar party in nashik

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar Vs Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मविआ कडून रणनीती आखली जात आहे. शरद पवार राज्यात ठिकठिकाणी दौरे करत शेतकरी मेळावे घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहेत. (NCP Political Updates)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार काही आमदार सोबत घेऊन महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार एकाकी पडले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने तुतारी या नव्या चिन्हावर १० पैकी ८ खासदार निवडून आणले. त्यामुळे आता विधानसभेला तुतारी (Tutari) चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.(Sharad Pawar Vs Ajit Pawar)

दरम्यान आता शरद पवारांनी अजित पवारांना धक्का देण्यासाठी तगडं प्लॅनिंग केलं आहे. आज (दि.२३) राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा नाशिकमध्ये दाखल होत आहे. आता सलग तीन दिवस ही यात्रा नाशिकमध्ये मुक्कामी असणार आहे.

या यात्रेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासह महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडून अनेक आमदारांनी अजित पवारांची साथ दिली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तब्बल ६ आमदारांचा समावेश आहे.

यात देवळाली विधानसभा मतदारसंघातील (Deolali Assembly Constituency) आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire), येवला मतदारसंघातील (Yevla Assembly Constituency) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिंडोरीमधून (Dindori Assembly Constituency) नरहरी झिरवळ (Narhari Zirwal), कळवणमधील (Kalwan Assembly Constituency) आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar), निफाडचे (Niphad Assembly Constituency) आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Sinnar Assembly Constituency) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहेत.

आगामी निवडणुकीत या आमदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार गटाने चांगलीच कंबर कसली आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते नाशिक जिल्ह्यात जंगी सभा घेणार आहेत.

अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात देखील शरद पवार गटाकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सटाणा, देवळा आणि नाशिकमध्ये दाखल होईल. त्यानंतर याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जंगी सभा होईल.

तर उद्या म्हणजेच मंगळवारी आणि परवा बुधवारी देखील नाशिक जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा (Shiv Swaraj Yatra) जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस नाशिककरांना राजकीय सामना पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/DALhi4UiZ68/

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Nitin Gadkari On Ramdas Athawale | ‘आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी’, नितीन गडकरींचे वक्तव्य

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)