Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही?, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं…

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन –  Sharad Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर छापे टाकले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा छापे टाकत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना माध्यमांनी केल्याने पवार यांनीही त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांनी करावे.
असे आम्ही 3 पक्षांनी मिळून ठरवले आहे.
त्यामुळे इतर कोणत्या नावाचा विचार आम्ही केलेला नाही.
त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरे कोणी या पदावर येणार नाही.
असं स्पष्टच पवार यांनी सांगितलं आहे. तर उद्धव ठाकरे यांना मुख्यंमंत्री करण्यासाठी मी स्वतः आग्रही होतो.
असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.

दरम्यान, या सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे 2-3 नावे होती.
पण, आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते.
त्यांचा हात मी स्वतः वर केला आणि ठाकरे हे आपल्या सरकारचे नेतृत्व करतील.
असे जाहीर केल्याची आठवण त्यांनी या निमित्ताने सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता.
त्यात माझाही किंचित वाटा होता, असं पवार यांनी सांगितलं.

 

Web Title : Sharad Pawar | Will Ajit Pawar become the Chief Minister or not ?, Sharad Pawar clearly stated …’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jacqueline Fernandez | ‘ईडीला उत्तर’न देता जॅकलीन पोहोचली ‘रामसेतू’च्या शुटिंगसाठी

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आरक्षणाबाबत मोठं विधान, म्हणाले…

Sharad Pawar | ‘जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय’ – शरद पवार