Sharad Pawar | …यापुढे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित रहाणार नाही – शरद पवार (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Sharad Pawar | मागील काही महिन्यात कोरोना बाधितांची (Corona virus) संख्या कमी होती. मात्र आता ती वाढताना दिसत आहेत. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनीही सार्वजनिक कार्यक्रमांना जाणार नाही, हजारो लोकं जमतील, ते कार्यक्रम करणार नाही, असे म्हटलं आहे. शरद पवार म्हणाले की, मी जुन्नरला कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेथे कार्यक्रमाच्या आयोजकांशी संपर्क केला, त्यांना विचारलं तुम्ही परवानगी घेतली का, पोलीस परवानगी घेतली, आरोग्य विभागाची परवानगी घेतली का? त्यांनी सर्व हो म्हटल्यावरच मी कार्यक्रमाला गेलो. असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी कार्यक्रमाला गेल्यावर पाहिलं, व्यासपीठावर सोशल डिस्टन्स होतं, पण समोर लोकं होते तिथे सोशल डिस्टन्स नव्हतं. ते मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे, यापुढे हजारोंच्या संख्येनं लोकं जमतील, अशा कार्यक्रमांना मी जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कार्यक्रम एका हॉलमध्ये असावा आणि तेथे सोशल डिस्टन्स म्हणजे दोन खुर्च्यांमध्ये एका खुर्ची रिकामी आहे का, याची पाहणी करूनच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे.

Web Title : Sharad Pawar | will no longer attend public events sharad pawar warn about corona

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update