‘या’ कारणामुळं शरद पवारांना ED कार्यालयात प्रवेश मिळणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत यांनी शुक्रवाारी कोणतीही नोटीस आली नसताना आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहून पाहुणचार स्विकारणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार शरद पवार यांनी आपण उद्या दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. मात्र शरद पवारांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळत आहे.

‘या’ कारणामुळे ईडीच्या कार्यालयात प्रवेश नाही मिळणार –

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे आता ‘ईडी समोरच पेच निर्माण झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.

जमावबंदीचे आदेश जारी –

शरद पवारांच्या ईडी कार्यालयाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षिण मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. कायदा सुव्यवस्था विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती पोलिसांकडून शरद पवारांना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे. मात्र असे असतानाच या संपूर्ण प्रकरणाशी शरद पवार यांचा थेट काय संबंध आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Visit : policenama.com