‘कोरोना’मुळे साखर उद्योगाला मोठा फटका, शरद पवारांचे केंद्र सरकारला पत्र

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत असून सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. विशेषतः मुंबई, पुण्यात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळत चालली असल्याने अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून अर्थव्यवस्थेची चाके थांबली आहेत. त्यामुळे साखर व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

साखर उद्योगाला कोरोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे साखर उद्योग डबघाईस जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने साखर उद्योगाला पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे अनेक उदयोग बंद पडले आहेत. मजूर वर्गाला हाताला काम मिळत नसल्याने त्यांनी गावाकडे वाट धरली आहे. उदयोजकांकडे पैसा नसल्यामुळे व्यवसाय सुरु करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारासोबत व्यवसायाच्या गणिताचा ताळमेळ घालताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.