म्हणून शरद पवारांनी घेतली माढ्यातून माघार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशाची हवा कोणत्या दिशेने वाहते याचा अंदाज शरद पवार अचूक ताडतात. अपघात टाळण्यासाठी शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे. देशात सध्या मोदीमय वातावरण आहे. त्यामुळे शरद पवार यांनी माढ्यातून लढून दाखवावे. त्यांना आम्ही पराभूत करून दाखवू असे आव्हान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांना दिले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विनोद तावडे, आदी भाजप नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष पद सांभाळणारे आणि स्वराज्य उद्योग समूहाचे प्रमुख रणजितसिंह निंबाळकर यांचे फलटण तालुक्यात चांगले प्रस्थ आहे. त्यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश म्हणजे काँग्रेस आघाडीला मोठा हादरा मानला जातो आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचीच आम्हाला साथ आहे. रणजितसिंह निंबाळकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोंघाच्या मागणीतील कृष्णा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे.

भाजपचे सरकार आले कि सगळा निधी विदर्भात जाणार असा भ्रम पश्चिम महाराष्ट्रात जाणीवपूर्वक पसरवला जात होता. मात्र आमच्या सरकारच्या काळात सर्वाधिक निधी हा पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

या प्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शरद पावर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्याच प्रमाणे जातपात पक्ष विसरून मुख्यमंत्री गोरगरिबांचे आहेत. त्यामुळे भाजप येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकणार आहे असे सुभाष देशमुख यांनी म्हणले आहे.